ग्रामस्थांच्या जबाब नोंदणी नंतर रेशन घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार उजेडात येईल का?

Cityline Media
0
हनुमंतगाव रेशनिंग घोटाळा चव्हाट्यावर 

सोनगाव प्नतिनिधी राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरात नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेशन साठा जप्त करून आरोपीस मुद्देमालासह जेरबंद केले.हा सर्व धान्य साठा परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे आरोपीने कबुल केले.त्यात राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील पाच महिन्यांचे धान्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
हनुमंतगावातील ग्रामस्थांनी गावातील हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर नुकतेच पुरवठा अधिकारी यांच्याकडील पत्रानुसार हनुमंतगाव येथील तलाठ्यांनी ग्रामस्थांना नोटीसीद्वारे कळविले होते की गावातील स्वस्त धान्य दुकान विषयी जे तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या ६६ रेशन कार्ड धारकांनी तक्रार दाखल केली आहे यांच्या जबाब नोंदणीसाठी आपण ग्रामपंचायत कार्यालय हनुमंतगाव या ठिकाणी उपस्थित राहावे तद्नंतर ग्रामस्थांनी उपस्थित राहून जबाब नोंदणी दिली आहे.

यावेळी ग्रामस्थानी आक्षेप घेऊन जबाब हा आमच्या म्हणण्यानुसार व आम्ही जो जबाब देणार आहोत तोच आपण लिहून घ्यावा अशी विनंती केली त्या संदर्भात पुरवठा अधिकारी म्हणाले की तुम्ही तुमचा जबाब देऊ शकत नाही.

आम्ही आणलेल्या कागदावर हो किंवा नाही एवढ्यावर तुम्हाला सह्या कराव्या लागतील.तिथे थोडा गोंधळाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मग पुरवठा अधिकारी यांनी तुम्ही तोंडी जबाब द्या! मी तो जबाब लिहून घेतो असे सांगितल्यानंतर थोडकेच उपस्थित लाभार्थी रेशन धारक होते यांचे जबाब नोंदणी करून घेण्यात आली.
आता या जबाब नोंदणी नंतर या घोटाळ्यातील बडे धेंडं उजेडात येतील काय?असा प्रश्न निर्माण होतोय आणि या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!