सरसकट कर्जमाफीसाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार

Cityline Media
0
नोंदणीकृत सावकारांच्या कर्जाचाही समावेश व्हावा

वेल्हाळेत विकासकामांचे लोकार्पण 

संगमनेर प्रतिनिधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा महायुती सरकारचा निर्णय निश्चित झाला असून त्यातील अटी व निकषांबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे.केवळ बँकांकडून घेतलेल्या कर्जाचीच नव्हे,तर नोंदणीकृत  सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्याही कर्जाचा कर्जमाफी योजनेत समावेश व्हावा,यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील वेल्हाळे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन,उद्घाटन व लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास प्रशासक विष्णू आव्हाड, सिताराम गुळवे, सुदाम सोनवणे, सोमनाथ जगताप, सिताराम पानसरे, बाळासाहेब जेडगुले, कैलास जेडगुले, उत्तम जेडगुले, राजू सोनवणे, किशोर भांड, गणेश सोनवणे, लष्कर सुभेदार सुनील भांड, संदीप सोनवणे, भारत सोनवणे, ज्ञानेश्वर गुळवे, संजय सोनवणे, पंचायत समितीचे उपअभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की,तालुक्याचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास करणे हेच आपले ध्येय आहे.शहरालगतच्या अनेक गावांमध्ये पूर्वी प्लॉटिंग झाली; मात्र रस्ते,गटारे आणि पिण्याच्या पाण्या सारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. आता या भागांचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर दिला जात असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तुकडाबंदी कायद्यामुळे अनेक नागरिकांना खरेदी केलेल्या जागांचे उतारे मिळण्यात अडचणी येत होत्या.महायुती सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५० लाख नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच वेल्हाळे गावासाठी पहिल्याच वर्षात ७७ लाख ९३ हजार रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन आमदार असूनही राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यास सर्वाधिक निधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
तालुक्यातील प्रत्येक गाव ‌वाडीतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील.
मी केवळ संगमनेर विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित न राहता तालुक्यातील १७१ गावांतील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे.
आमदार अमोल खताळ
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!