मांडवे बुद्रुक येथे विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

Cityline Media
0
आत्महत्या की घातपात प्रश्न अनुत्तरीत.
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्तीवरील विहिरीत एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना  ‌नुकतीच उघडकीस आलीय.हा मृत्यूदेह अज्ञात महिलेचा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घडलेल्या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,मांडवे बुद्रुक शिवारातील डोलनर वस्तीवर भिका डोलनर यांची शेतात विहीर आहे.मात्र या विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले.

ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर घारगाव पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, महादेव हांडे,सुरेश शेळके, चंद्रकांत मेढे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी बाजाच्या साहाय्याने संबंधित महिलेचा मृतदेह विहिरीतून वर काढला यावेळी पोलिसांनी संबंधित विवाहित महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र सदर महिला या परिसरातील नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.ही महिला विहिरीत कशी पडली? तिने आत्महत्या केली का?तिचा घातपात आहे अशी चर्चा आता परिसरात होत आहे.

हि महिला साधारणपणे २० तासांपुर्वी विहिरीत पडली असावी असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.या महिलेला कुणी ओळखत असेल तर त्यांनी घारगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केलं आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!