संगमनेर प्रतिनिधी संगमनेर येथील अमृतवाहिनी आय.टी.आय.अमृतनगर, नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक मध्ये ८० विद्यार्थ्यांची निवड अद्वैत साठे डेप्युटी मॅनेजर एम्प्लॉय रिलेशन यांनी केली, महिंद्रा अँड महिंद्रा चाकण, पुणे मध्ये ८६ विद्यार्थ्यांची निवड नागेश जोशी एच.आर. मॅनेजर यांनी केली,
मरेली मदरसन लाइटिंग इंडिया लि. पुणे मध्ये ४० विद्यार्थ्यांची निवड पूर्वेश सूर्यवंशी जूनियर एक्झिक्यूटिव्ह व यश इंगवले एच. आर. असिस्टंट यांनी केली, मल्टीक्वाड्रंट इंडस्ट्रियल कंट्रोल लि. सिन्नर मध्ये १५ विद्यार्थ्यांची निवड संजय पवार एच.आर. मॅनेजर व विनोद पाटील प्रोडक्शन इनचार्ज यांनी केली, जे.बी.एम. ग्रुप सिन्नर मध्ये २२ विद्यार्थ्यांची निवड तुषार कापसे एच. आर. मॅनेजर यांनी केली. या नामांकित कंपन्यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यापैकी एकूण २४३ विद्यार्थ्यांची निवड केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी आय.टी.आय. ची स्थापना १९८४ साली केली. संस्थेने गुणवत्तेत सातत्य राखल्याने संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर, शिस्त, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व आधुनिक सुविधा यामुळे विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त .डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव, आय.टी.आय.चे प्राचार्य व्ही.व्ही. भाटे व नामदेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग व सर्व स्टाफ ने विशेष परिश्रम घेतले आहे.
