श्रीरामपुरातील आकाश दुबैय्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चास उस्फुर्त प्रतिसाद

Cityline Media
0
श्रीरामपूर सोमनाथ डोळे शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहराच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारीविरोधात सलग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये वाढता असंतोष आणि सुरक्षिततेबाबतची चिंता स्पष्टपणे दिसून आली. दरम्यान आज चौथ्या दिवशी  सकाळी १० वाजता शहरातील श्री हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा, लहान-मोठी दुकाने, टपऱ्या तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शनिवारी भरदिवसा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलमध्ये आकाश दुबैया यांची झालेली निघृण हत्या ही शहरातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर घटना मानली जात आहे. गेल्या महिनाभरापासून  चाकू हल्ले, कोयत्याने वार, गोळीबार आणि इतर हिंसक प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर  सर्वपक्षीयांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना मंगळवारी शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती . मात्र, सलग तीन दिवस शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी तीन दिवसांच्या शांततापूर्ण बंद नंतर आज काढलेल्या मोर्चातून गुन्हेगारी विरोधातील रोष व्यक्त करत शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे. , दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!