वाढदिवसानिमित्त स्कायलाईट ग्रुपकडून रामपूरफाटा शाळेला शैक्षणिक साहित्य भेट.

Cityline Media
0
लोणी-रुपाली भालेराव राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रामपूरफाटा या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कायलाईट ग्रुप कोल्हार यांच्या वतीने
स्कायलाईट ग्रुपचे सदस्य अरुणराजे फोफसे यांचे चिरंजीव शौर्य याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 
 विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरफाटा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले.शौर्यच्या वाढदिवसाला इतर खर्च करण्यापेक्षा शाळेला दोन फॅन व ऑफिस कामासाठी प्रिंटर भेट देऊन स्कायलाईट ग्रुपने शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या भावनेतून या साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यामागे मनोदय असल्याची भावना यावेळी अरुणराजे फोफसे यांनी व्यक्त केली. यावेळी स्कायलाईट ग्रुपचे सदस्य शरदनाना खर्डे,
निलेश संपतराव खर्डे, सचिन उत्तम राऊत ,वसंत खर्डे शिवाजी शिपणकर, निलेश विधाते, शंकर शिपणकर, नानासाहेब गायकवाड हे उपस्थित होते.

रामपूरफाटा शाळेस केलेल्या भरीव मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिवटे यांनी स्कायलाईट ग्रुप कोल्हार व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. वसंत खर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

समाजाभिमुख उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,स्कायलाईट ग्रुपच्या या कौतुकास्पद निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. वाढदिवस साजरा करण्याची ही नवी आणि समाजाभिमुख पद्धत इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.भविष्यातही अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे करत राहू,असा निर्धार स्कायलाईट ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी बोलून दाखवला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!