सात्रळच्या रयत संकुलनात पालक मेळावा उत्साहात

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय,व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयात  संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू   व विद्यालयाचे प्राचार्य श्री.गारुडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक पालक मेळावा ॲड.विजय कडू भागवत कारभारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुकुंद क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता रयत संकुलाचे प्राचार्य श्री.गारुडकर  यांनी सर्वांचे स्वागत केले तर विलास दिघे व त्रिंबक राशिनकर यांनी प्रास्ताविकात शासन व संस्थेच्या धोरणानुसार विद्यालयातील विविध नियोजने व कार्यवाही याविषयी सविस्तर माहिती दिली.

उपलब्ध सुविधा सांगून विविध प्रकल्प व गुरुकुल उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली एआय या नवीन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन त्याची कार्यवाही करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी पालकांच्या प्रतिक्रिया व अभिप्राय जाणून घेतल्या.

प्राचार्य श्री. गारुडकर व प्रा.श्री. हापसे यांनी पालकांच्या शंका व समस्या यांचे निराकरण केले व विद्यालयाची अधिकाधिक प्रगती कशी होईल याकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू  जनराल बॉडी सदस्य किरण कडू ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य  पंकज  कडू मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन  रामदास तांबे, प्राध्यापिका के.आर.पवार यांनी केले तर आभार  पर्यवेक्षिका हेमलता साबळे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!