श्रीरामपूरत संत इग्नेशिअस सण उत्साहात साजरा

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील लोयोला सदन या चर्चमध्ये धर्मग्रामाचा आश्रयदाता संत इग्नेशिअस लोयोला यांचा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
सणाच्या अगोदर तीन दिवस लोयोला सदन या चर्च मध्ये संत इग्नेशिअस लोयोला यांची नोव्हेना साजरी करण्यात आली.या नोव्हेना करताना संत ब्रेवियर्स स्कूल गेवराई येथील रे.फा.विजय चोखर, जिल्हा पर्यवेक्षक संगमनेर येथील रे.फा.ज्यो गायकवाड,संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालयाचे उपप्राचार्य रे.फा. प्रशांत शाहराव यांनी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने नोव्हेना साजरा केला.

संत इग्नशिअस लोयोला यांना अभिवादन करण्यासाठी उत्सव समिती लोयोला सदन चर्च व ख्रिस्ती विकास परिषद यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच सायंकाळी श्रीरामपूर येथील लोयोला सदन चर्च मध्ये निरोप्याचे संपादक प्रमुख याजक रे.फा.भाऊसाहेब संसारे यांनी सर्वांसाठी मिस्सा अर्पण केला. 

लोयोला सदन धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.अनिल चक्रनारायण, रे.फा.राजू शेळके, रे.फा.मथ्यू परेरा, जिल्हा पर्यवेक्षक संगमनेर येथील रे.फा.ज्यो गायकवाड, 

ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथील प्राचार्य रे.फा.पटेकर,उपप्राचार्य रे.फा.प्रशांत शाहराव,रे.फा.जाॅन गुलदेवकर ,रे‌.फा.जेकब गायकवाड ,रे.फा.विजय चोखर,रे.फा.विशाल त्रिभुवन, रे.फा.रत्नाकर दुशिंग, रे.फा.आनंद बोधक,

रे.फा.प्रमोद बोधक, रे.फा.के.के.जोशी, रे.फा.सुभाष त्रिभुवन, रे.फा.डि.अल्बर्ट,रे.फा.
पिटर खंडागळे , रे.फा.राॅबर्ट दास, रे.फा.सुनिल गायकवाड, संत झेवियर इंग्लिश मेडीयम स्कूल राहता येथील रे.फा.पाॅली डिस्लवा,हरेगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.डामानिक रोझारिओ,पिटर डिसुझा,अशोकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ऑल्विन तसेच संत लुक हाॅस्पिटलच्या सर्व सिस्टर,कानोसा होस्टेल येथील सर्व सिस्टर व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!