दोन कोटी निधी प्राप्त लोणी बसस्थानक नुतनीकरण कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Cityline Media
0
राज्य शासनाच्या योजनामुळे लोणीचे बसस्थानक अद्यावत होणार-मंत्री विखे पाटील

लोणी रुपाली भालेराव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला नेहमीच आधार दिला असून,ग्रामीण भागातील वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून ‌लालपरीची ओळख आहे.राज्य शासनाच्या लोकभिमुख योजनांमुळे एसटी महामंडळ नव्या उमेदीने प्रगती करत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर  विभागाच्या अंतर्गत राहाता तालुक्यातील लोणी येथील बस स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की,बस स्थानकाचे काँक्रीटीकरण हे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या कामामुळे स्थानकाचा कायापालट होणार असून,प्रवाशांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर पायाभूत सुविधा मिळतील.
बस स्थानकाचे काँक्रिटीकरण हे प्रवासांच्या सोयीच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहेत कारण पावसानंतर चे पाणी साचून राहते ते पाणी यापुढे साचणार नाही सर्व सामान्यांच्या दृष्टीने बसस्थानक अद्यावत करणे हे महत्त्वाचे आहे.

एसटी बसने प्रवास करणारा सर्वसामान्य वर्ग हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो याकरिता अनेक नवीन बसेस देखील चालू करण्यात आलेले आहे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता रा.प.परिवहन ‌ महामंडळाचे नेहमीच प्रयत्न चालू असतात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती कार्यकारी अभियंता रा.प. नाशिक प्रदेश श्रीमती विद्या भिलारकर अशोक धावणे,बाळासाहेब आहेर,किसन विखे, संगमनेर आगार प्रमुख निलेश बटकुळे, लोणी बस स्थानकाचे प्रमुख रावसाहेब पर्वत आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामासाठी शासनाने सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, २०१० मध्ये 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (बोट) तत्त्वावर अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम लोणी येथे आधुनिक बस स्थानकाची उभारणी करण्यात आली होती.

आता काळाची गरज ओळखून या स्थानकाच्या नूतनीकरणावर विशेष भर दिला जात आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास व्यवस्था निर्माण करणे हे शासनाचे ध्येय आहे. या नूतनीकरणामुळे प्रवाशांची सोय होणार असून एसटी महामंडळाच्या सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

लोणी येथे आधुनिक बस स्थानकाची उभारणी करण्यात आली स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून बस स्थानकाचे काम करण्यात आले परिवहन महामंडळाचे अध्यक्ष स्व.सुधाकर परिचारक यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प पूर्णत्वास उतरला.

आज लोणी बस स्थानक हे स्वच्छता सुरक्षितता उत्कृष्ट नियोजनाच्या बाबतीत राज्यासाठी आदर्श ठरत आहे  शिवाय,बस स्थानकावरील ग्रामस्थांच्या  देखरेखीमुळे येथे आतापर्यंत कोणताही गैरप्रकार घडलेला नाही,ही आनंदाची बाब असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

बस स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रीरामपूर आगार येथून आश्वी कडे जाणाऱ्या बसेस कोविड नंतर बंद झालेल्या होत्या तसेच मुक्कामी असणाऱ्या बसेस देखील येत नव्हत्या या बंद झालेल्या बसेस पुन्हा सुरू करण्याची सूचना मंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर आगार यांना दिलेली आहे.

जाणारे येणाऱ्या प्रवासी वर्गाचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी नागरिकांना बसण्यासाठी बस स्टॅन्ड मध्ये अद्यावत असणारी आसन व्यवस्था सुसज्ज असायला हवी याकरिता प्रयत्न नक्कीच राहतील महिलांसाठी योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणल्यामुळे एसटी महामंडळ हे विश्वासात पात्र ठरले आहे.

आजूबाजूच्या परिसरातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ये जा करण्यासाठी देखील बसची सोय करण्यात आलेली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले लोणी बस स्थानकात असणारी स्वच्छता आणि कामाचे स्वरूप उत्कृष्ट आहे यावेळी बोलताना वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांचे कौतुक केले तसेच अभिनंदनही केले.

लोणी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री.पर्वत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २०२५ -२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर व स्थानक अभियानात अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी  बस स्थानकाचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या उल्लेखनीय आणि घवघवीत यशाबद्दल महामंडळाकडून लोणी बसस्थानकास पाच लाख रुपयांचे भव्य बक्षीस आणि सन्मान चिन्ह देखील प्रदान करण्यात आले. या अभियानांतर्गत केवळ बस स्थानकाचा गौरव झाला नाही तर एसटी महामंडळाची सेवा प्रवाशांपर्यंत उत्कृष्टपणे पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही विशेष बहुमान करण्यात आला.

लोणी बस स्थानकाचे कर्तव्यदक्ष वाहतूक नियंत्रक श्री पर्वत यांना 'लाल परी गौरव पुरस्कार'  पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे प्रसंगी बोलताना ते म्हणाले की लोणी बस स्थानकाच्या कोणत्याही अडचणी असो त्यावेळेस नेहमीच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील आणि डॉ  सुजय विखे पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच लाभले आहे त्यामुळे लोणी बस स्थानक हे आजूबाजूच्या परिसरातून सर्वोत्कृष्ट ठरलेले आहे.बस स्थानकामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि नव्या विकास कामांची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना यावेळी त्यांनी दिली संगमनेर आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!