कलावंतांची मानवंदना,सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी
संगमनेर नितीनचंद्र भालेराव आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य स्पर्धेचे आयोजन कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहु विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ म्हणाले की कलावंतांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली पाहिजे,या भूमिकेतून कलाकारांच्या सन्मान केला जात आहे.
दुसऱ्या वर्षाचा कलावंत पुरस्कार तमाशा सम्राज्ञी आद्यनृत्यांगना पवळा हिवरगावकर यांच्या नावाने देण्यात येणार आहे.तसेच पवळा भालेराव हिवरगावकर सामाजिक सभागृह समोर पडवी, वॉल कंपाऊंड इतर सुविधांसाठी दहा लाख रुपये आपल्या आमदार निधीतून देण्याची घोषणा जयंती निमित्त अभिवादन पार बोलताना आ.अमोल खताळ यांनी केली.
तसेच दुसऱ्या वर्षाचा कलावंत पुरस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत पवळा हिवरगावकर यांच्या नावाने देण्यात येणार आहे.हा पुरस्कार महाराष्ट्रातील एका कलावंताला प्रदान केला जाईल.विशेष म्हणजे हा पुरस्कार सोहळा हिवरगाव पावसा येथेच आयोजित करण्याचा आपला संकल्प आहे असेही आ.अमोल खताळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यासाठी त्यांच्या वेळा घेण्यात येणार असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष सत्कार सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.
हिवरगाव पावसा येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप लोक कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थी नृत्य स्पर्धा,समारंभ आयोजित करण्यात आला होता.कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे कलावंत कवी गायक हरिश्चंद्र भालेराव,शाहीर मधुकर भालेराव,शंकर भालेराव,यादव भालेराव,राजेंद्र दारोळे या कलावंतांनी लोक गीतांच्या माध्यमातून पवळा भालेराव यांना मानवंदना दिली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगात्मक लोककाला प्रकारांतर्गत नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थी कुमार हर्षल गोफणे याच्या लावणी नृत्याने नागरिक भारावले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुकाचा वर्षाव, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शालेय स्पर्धकाचा अप्रतिम अभिनय आणि अदाकारी पाहून उपस्थित नागरिक थक्क झाले.उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपचे उपाध्यक्ष गणेश दवंगे,भाजपा तालुका सरचिटणीस केशव दवंगे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,
सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका कार्याध्यक्ष विजय खरात,
शहराध्यक्ष कैलास कासार,सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,मा. मुख्याध्यापक रघुनाथ भालेराव,शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, संपादक यादवराव पावसे,
सोसायटी संचालक अशोक भालेराव, संस्थेचे सचिव पवळा यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव,
दिनकर खरात,रामनाथ गडाख,भीम पावसे, मोठ्याभाऊ बडे,
सौ.रंजना भालेराव, शैला भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
