जिल्हा परिषद बेंद वस्ती शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

Cityline Media
0

लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील बेंद वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता.या सोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,शिक्षक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांची शिस्तबद्ध उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ज्ञानदेव पोकळे आणि उपाध्यक्ष पंढरीनाथ बाजीराव बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

या सोहळ्यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बाबुराव शेळके यांच्यासह संदीप शेळके,सुनील राऊत, सागर राऊत, भाऊसाहेब शेळके, भूषण शेळके,अमोल बोधक आणि विकास जाधव हे मान्यवर सहभागी झाले होते. महिला पालकांचा सहभागही उल्लेखनीय होता, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका कांता मते,मंदा शेळके, शारदा बर्डे,सविता जाधव,शितल रामदास जाधव,पल्लवी राऊत, शोभा शेळके आणि निकिता राऊत यांच्यासह अनेक मातांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अखेर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊ आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता. बेंद वस्तीच्या या प्राथमिक शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिनाचा हा कार्यक्रम ग्रामस्थ आणि पालकांच्या एकत्रित सहभागामुळे अत्यंत अविस्मरणीय आणि उत्साही ठरला.शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व  पटवून देताना काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली याशिवाय मुख्याध्यापक , वर्गशिक्षक यांनीही मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!