पारनेर प्रतिनिधी सुपा-पारनेर महामार्गालगत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी.पी.सी.एल)च्या उच्च दाबाच्या गॅस पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येत आहे.
मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांना
या घटनेची माहिती त्यांनी सुपा ग्रामपंचायत सदस्य दत्ता नाना पवार, प्रताप शिंदे ॲडव्होकेट सुरेश नेटके ,माजी सरपंच बाळासाहेब पवार यांच्या समवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.मिळालेल्या माहितीनुसार, सी.एच.नंबर १.८८७ येथे असलेल्या पाईपलाईन जवळ महावितरणच्या माध्यमातून वीज पोल उभारण्याचे काम सुरू असताना खोदकामामुळे ट्रॅक्टर ड्रिलने पाईपलाईनला धक्का लागून गळती सुरू झाली आहे.
घटनास्थळी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे सुचना 'फलक तसेच कोणतेही सुरक्षा कठडे, बॅरिकेड्स किंवा सुरक्षारक्षक तैनात नाहीत.त्यामुळे येथे मोठी हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही येथे उघड्यावर गॅस गळती सुरू असून एखादी ठिणगी पडल्यास मोठा स्फोट होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे.
घडलेल्या घटनेमुळे मनसे आक्रमक आक्रमक झाली असून नेत्यांनी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे "गॅस कंपनीने कोट्यवधी रुपयांची पाईपलाईन टाकली, पण सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.संबंधित ठेकेदार आणि गॅस कंपनी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असा संतप्त सवाल अविनाश पवार यांनी केला आहे.
जर २४ तासाच्या आत गॅस गळती रोखून संपूर्ण पाईपलाईनचे सेफ्टी ऑडिट केले नाही,तर मनसे स्टाईलने गॅस कंपनी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.या गंभीर घटनेकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
