ॲड.प्रकाश संसारे यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती

Cityline Media
0
राहुरी प्नतिनिधी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जेष्ठ विधिज्ञ व कॉग्रेसचे सक्रिय पदाधिकारी ॲड.प्रकाश संसारे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अंतर्गत एस.सी. विभाग कार्यकारी समितीच्या राज्य सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे देवळाली प्रवरासह राहुरी व श्रीरामपूर तालुका आणि अहिल्यानगर जिल्हयातील कॉग्रेस कार्यकर्त्य यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एस.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा.मंत्री आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी ॲड.प्रकाश संसारे यांच्या सामाजिक कार्याची, संघटन कौशल्याची आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत ही नियुक्ती जाहिर केली आहे.

राज्य सरचिटणीस या जबाबदारीच्या माध्यमातुन अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे,पक्ष संघटना अधिक सक्षम करणे तसेच राज्यभर पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणत आलेली आहे.

ॲड.प्रकाश संसारे हे गेल्या २७ वर्षा पासून राहुरी व अहिल्यानगर येथे वकिली व्यवसाय करतात.या नियुक्ती बद्दल कॉग्रसचे जेष्ठ नेते व मा.महसुल मंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,एस. सी.समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिरुध्द वनकर, 

खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार चंद्रकांत हांडोरे आमदार हेमंत ओगले,श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, बाळासाहेब आढाव, बंटी यादव तसेच देवळाली प्रवरा कॉग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी प्रकाश संसारे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!