नाशकात संशोधन स्पर्धेचे डॉ.निलेश पुरकर यांच्या उद्घाटन

Cityline Media
0
२५० प्राध्यापक सहभागी

नाशिक दिनकर गायकवाड शहरात नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे यांच्या वतीने आयोजित “संशोधन स्पर्धा २०२६” या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेच्या समन्वयक बैठकीचे उद्घाटन येथील सेलेब्रिटा,अंधशाळा नाशिक रोड येथे करण्यात आले.
आरोग्यसंपदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सेंटरचे संचालक व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. निलेश पुरकर यांच्या हस्ते रिबीन कापून या बैठकीचे औपचारिक उद्घाटन झाले.यावेळी विद्यापीठाचे डॉ प्रा.संजय खोब्रागडे, मानसोपचारतज्ञ प्रवीण गांगुर्डे,विद्यापीठाचे अधिकारी,महराष्ट्र राज्यातील संलग्न संस्थांचे प्राचार्य, संचालक व संस्था प्राध्यापक,समन्वयक उपस्थित होते.

उद्घाटनानंतर डॉ. निलेश पुरकर यांनी स्पर्धेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती व नवोन्मेषी विचारसरणी रुजविण्याची गरज अधोरेखित करत आरोग्यसंपादच्या आरोग्याच्या प्राथमिक तपासणीचे महत्व अधोरेखित केले.

त्यानंतर स्पर्धाची मार्गदर्शक तत्त्वे, सहभागाची प्रक्रिया,विभागीय व विद्यापीठ स्तरावरील फेऱ्यांचे नियोजन याबाबत सादरीकरणे झाली. प्रमुख पाहुण्यांना विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.डाॅ.संजय खोब्रागडे,डाॅ.संगिता मेटकर,प्राध्यापक तेजस महागांवकर, प्राध्यापक अनिकेत जंगम,डाॅ.माधुरी भगत, शिवांजली पवार, संतोष बटवले यांच्या समन्वयाने हा संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत सफल झाला आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातुन जवळपास २५० प्राध्यापक यात सामिल झाले होते.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठ संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठात सामिल आहे आणि तो वारसा भविष्यातही रहावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

डॉ. संजय खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सर्व संलग्न संस्थांनी आपले समन्वयक पाठवले होते. विद्यापीठाने सहभागी समन्वयकांना नाश्ता, दुपारचे जेवण,हाई टी व सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रतिष्ठित संशोधन स्पर्धा असून तिच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संस्थांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.अमित शेष, कुलगुरु डाॅ. रजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम शक्य झालेला आहे जो पहिल्यांदाच नाशिक शहरात मेत्ता फाऊंडेशन च्या सहकार्याने आयोजन करण्यात आला होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!