नाशिक दिनकर गायकवाड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नाशकात वकिल विचार अधिष्ठान विचार मंच आयोजित वैचारिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आरक्षण - उपवर्गिकरण, खाजगीकरण व सामाजिक एकता आणि आपले मुळ प्रश्न काय ? यावर वैचारीक मंथन झाले तसेच आण्णाभाऊ साठे यांचे कार्य यावर चर्चा झाली तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा-१९८ भारतीय सविधानाचे आर्टिकल १४, १७, २१, १९ ई. वर चर्चा झाली.
प्रसंगी ॲड.अमोल वानखडे यांनी आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक एकता भारतीयत्व आणि खाजगीकरण व आपले मुळ प्रश्न यावर मत व्यक्त केले प्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे , ॲड.अशोक आव्हाड ,ॲड. रवि काबंळे , ॲड.अमोल वानखडे, ॲड. प्रज्ञा शेजवळ, ॲड. गुलाब कर्टुले, पिपरीकर ,ॲड. प्रविण शेजवळकर,रविद्र सैदाणे, ई. मान्यवर उपस्थित होते.
