गायकरत्न सोमनाथ गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा गायकरत्न सोमनाथ गायकवाड यांचा नाशकात उत्साही वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.
कलाकारांच्या आयुष्यात दिवा लावणारा कलाकारांच्या संघटनेच्या माध्यमातून जिवंतपणा आणणारा खऱ्या कलाकारांच्या समस्या काय असतात याची जाणीव असणारा नेता तसेच संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कला क्षेत्रात खूप मोठे योगदान अधोरेखीत झालेले आहे.

श्री.गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलावंत आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या तसेच व्हाट्सअप वरील विविध ग्रुपमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशःवर्षाव झाला.

विविध क्षेत्रातील कलावंतांनी प्रेम, स्नेह व आदर व्यक्त करत सोमनाथ गायकवाड यांना कोटी कोटी मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक व कलावंतांच्या हक्कांसाठीच्या कार्याला यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!