नाशिक दिनकर गायकवाड शहरातील इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या गणेश मंडळाला मंत्री छगन भुजबळांनी सदिच्छा भेट दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दुपारी झालेल्या चर्चेनंतर संध्याकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भुजबळांचे जल्लोषात स्वागत केले.त्यांच्या भेटीबद्दल पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी संदेश केदारे, किरण नाईक,सतीश रुपवते यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
“दुपारी चर्चा… संध्याकाळी साहेब भेटीला… धन्यवाद साहेब!” असा उत्साह पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाला.
