नाशकात मातंग समाज ‌उपवर्गीकरणच्या मागणीसाठी एकवटला

Cityline Media
0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी; ‘उपवर्गीकरण झालेच पाहिजे’च्या घोषणांनी परिसर दणाणला

नाशिक दिनकर गायकवाड अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मातंग समाजातील विविध संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा दरम्यान “उपवर्गीकरण झालेच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी आक्रमक भूमिका मांडली.मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत घोषणाबाजी केली.त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होऊन परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वंचित घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळावा,अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.मोर्चामुळे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!