नाशिक दिनकर गायकवाड कॉकरोच जनता पार्टीच्या “स्कूल ठीक करो” अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी सुरू झाली आहे.या पाहणी दरम्यान शाळांमधील मूलभूत सुविधा,शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून संबंधित माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली जात आहे.
मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांचे सहकार्य मिळत असल्याने ही पाहणी प्रभावीपणे पार पडत आहे.मराठी शाळा वाचवणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेला सुरुवात झाली असून ती ठाम तत्त्वाने व मोठ्या दिशेने पुढे जाणार आहे. अभियान सातत्याने सुरू राहील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.या मोहिमेत कॉक्रोज जनता पार्टी प्रतिनिधी म्हणून रामेश्वर गवई, डॉ. प्रवीण गांगुर्डे, सदानंद पांडव,ज्योती मोरे,महेश गांगुर्डे, गोरख मोहिते आणि धीरज सोनवणे सहभागी झाले होते.
