श्रीरामपूर दिपक कदम शहरात संगमनेर रोडवरील बुवा मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या सर्कसचे प्रकाश महादू माने हे सर्कसचे मालक आहे.त्याच्या आजोबापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाच आहे.
यावेळी प्रकाश माने बोलताना म्हणाले की रामआप्पा महादेव माने हे माझे आजोबा तिन पिढ्यापासून सर्कस चालवत आहे.
मी स्वतः आठ सर्कस तयार केल्या होत्या. आता मी चार सर्कसचा मालक आहे.
खूप कष्टाने सर्कस उभी केलेली आहे.गुजरात मध्ये आमची सर्कस वाहून गेली होती.तरी न डगमगता तीन पिढ्यांपासून आमची सर्कस चालू आहे. सर्कसचा फार अनुभव आहे किती कष्ट असतात हे आम्हाला माहीत आहे.
यावेळी भावुक होत ते पुढे म्हणाले की आमचे आजोबा म्हणायचे की, कष्टाने माणूस जर पूढे गेला तर तो माणूस शेवटपर्यंत जगू शकतो.आज आमच्या सर्कस मध्ये अनेक राज्यातून म्हणजे बंगाल, मणिपूर, महाराष्ट्र,कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्यप्रदेश,राजस्थान या ठिकाणावरून मिसळ स्वरूपाचे कलाकार एकत्र काम करत आहे.
माझे एकच दैवत आहे ते म्हणजे प्रेक्षक आणि
प्रेक्षक म्हणजेच खरे आमचे दैवत आहे. प्रेक्षक आले तर मोठ्या मनाने मोठा देव भेटतो.आणि देव देखील खूश होतो.म्हणून सर्कसचा आनंद लुटा,लेकरांना दाखवा,साथ द्या, सर्कसचा लाभ घ्या.असे आवाहन यावेळी प्रकाश माने यांनी केले.
