चाईल्ड टू चाईल्ड,स्व.दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान तर्फे कोंची जि.प.शाळेत स्वच्छता संच वाटप.

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी पुण्यातील चाईल्ड टू चाईल्ड्स सेवाभावी संस्था आणि संगमनेर तालुक्यातील कोंची येथील स्व.दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान,यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेक शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वच्छतेच्या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील कोंची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील १०० विद्यार्थ्यांना स्वच्छता संचाचे( टूथपेस्ट, टूथब्रश,साबण,तेल व पावडर) मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण  दिसून आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांनी पालकांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात समाधानकारक संवाद साधला.तसेच चाईल्ड टू चाईल्ड आणि स्व.दादाभाऊ प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेची कृतज्ञता केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!