दादर टिळक भवनात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची ऐतिहासिक आढावा बैठक

Cityline Media
0
 
संविधान रक्षणाचा निर्धार

मुंबई प्रतिनिधी मुंबई दादर येथील टिळक भवन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
बैठकीस अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे ,तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम गायक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हक्काचे नेतृत्व डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीचे नेटके आयोजन प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी केले होते.

प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, "आज देशात संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचवायचे असेल तर राहुल गांधीजींचे हात बळकट करावे लागतील. काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थाने दलित,शोषित, वंचितांचा आवाज आहे.आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः खा. मल्लिकार्जुन खरगे हे अनुसूचित जाती समाजातून येतात,यावरूनच कळते की काँग्रेस मध्ये जातीपातीचे राजकारण होत नाही तर कर्तृत्वाला संधी दिली जाते.अनुसूचित जाती विभागाने आता गावागावात जाऊन संविधान बचावाचा लढा अधिक तीव्र केला पाहिजे."

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, "महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची भूमी आहे. शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारावर हा महाराष्ट्र उभा आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जाती विभाग अधिक मजबूत करून बुथस्तरापर्यंत संघटन पोहोचवले पाहिजे."

डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले, "काँग्रेसचा इतिहास हा त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे.आज आपल्याला विचारांची लढाई लढायची आहे. सोशल मीडियापासून ते मैदानापर्यंत आपण संविधानाचे रक्षक म्हणून उभे राहिले पाहिजे."

प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात सांगितले की, "मी एक कलाकार म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मला पदापेक्षा माणसं मोठी वाटतात. सामान्यातील असामान्य कार्यकर्त्याला ताकद देणे हेच माझे ध्येय आहे.आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दुसऱ्यांदा दौरा करणार आहोत."

यावेळी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष,जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी सादर केला. अहिल्यानगर जिल्ह्यातून जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, ज्येष्ठ काँग्रेस नेते मारुती सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विनोद गायकवाड, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!