पत्रकार मिलिंद किर्ती यांचे नागपुरात अपघाती निधन

Cityline Media
0
नागपूर दिनकर गायकवाड सोशिओ-टेक्नॉलॉजी आणि टेक्नो-फिलॉसॉफीचे अभ्यासक, विचारवंत, पत्रकार मिलिंद कीर्ती यांचे नुकतेच नागपूर येथे अपघाती निधन झाले आहे.
मिलिंद कीर्ती लिखित कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग या ग्रंथाच्या दोन खंडांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गत वर्षी नाशकात झाले होते.
लोकवाङ्मय गृह प्रकाशन,मुंबई आणि प्रगतशिल लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार, मा. संपादक व मा. राज्यसभा सदस्य डॉ. कुमार केतकर यांच्या हस्ते व  लोकवाङ्मय गृह प्रकाशनाचे संचालक डॉ. भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते तसेच या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत,रिपब्लिकन व लढाऊ कामगार नेते श्याम गायकवाड हे उपस्थित होते.

मिलिंद कीर्ती यांनी लिहिलेल्या या दोन्ही ग्रंथांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलणारे सामाजिक, आर्थिक व मानवी जीवनाचे पैलू उलगडण्यात आले आहेत. पहिला खंड ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ माहिती तंत्रज्ञान, एआय,रोबोटिक्स, आयओटी, ब्लॉकचेन यांसारख्या तंत्रज्ञानाचा मानवजीवन आणि आर्थिक विकासावर झालेल्या प्रभावाचे विस्तृत विश्लेषण करतो. तर दुसरा खंड ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ भारतातील एआयचा आर्थिक उपयोग, संभाव्य बेरोजगारी तसेच तंत्रज्ञानाच्या पाळतीमुळे लोकशाहीसमोरील आव्हानांचा वेध घेतो.

या ग्रंथांना आतापर्यंत महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, य. खु. देशपांडे संशोधन पुरस्कारासह एकूण सात महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच मिलिंद कीर्ती यांच्या ‘दहशतवाद : न्यूयॉर्क ते खैरलांजी’, ‘नवयान : विषमताअंताचा लढा’, ‘मोहरा महाराष्ट्राचा’ यांसारख्या उल्लेखनीय पुस्तकांचेही प्रकाशन झाले आहे.अशा या अत्यंत प्रतिभावान,महान विचारवंत साहित्यिकास सर्व स्तरातून श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!