उपाध्यक्षपदी नारायण ढमक बिनविरोध
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक प्रा.गणेश खेमनर यांची, तर उपाध्यक्षपदी नारायण ढमक यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
प्रा.गणेश खेमनर
शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या प्रा.गणेश खेमनर यांच्यावर आता सहकार क्षेत्रातील महत्त्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातील सहकार चळवळीला व संस्थेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. शेतकरी,सभासद आणि ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सोसायटीच्या माध्यमातून विविध शेतकरीभिमुख व विकासात्मक उपक्रम राबविणार आहे,अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.खेमनर यांनी यावेळी दिली.
नारायण विठोबा ढमक
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री जोशी यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा बँकेचे शाखाधिकारी दिलीप लावरे व सोसायटीचे सचिव संदीप उनवणे यांचे सहकार्य लाभले.
प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक बाजीराव खेमनर,विखे पाटील कारखान्याचे संचालक भास्कर पाटोळे, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक ,सोपानराव गुळवे
सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान ढमक काशिनाथ पावडे. हौशाबापू पाटोळे,ज्ञानदेव खेमनर,सुभाष पाटोळे, सुभाष पावडे, भाऊसाहेब गुळवे, शंकर खेमनर,संतोष पावडे,रामभाऊ पाटोळे, श्री.लोहाळे, रामनाथ ढमक, दीपक घोगरे, पै. पोपट खेमनर, चंद्रभान सिनारे, पोपट खेमनर, बाबासाहेब पाटोळे यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
