दाढ बुद्रुक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Cityline Media
0
दाढ बुद्रुक प्नतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या धम्मदीक्षेला आज सत्तर वर्षे पूर्ण झाली तसेच सम्राट अशोक यांनी २३२६ वर्षांपूर्वी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन निमित्ताने राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता स्मारक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी चनेगाव गावचे पोलीस पाटील भाऊराव लोहाळे हे प्रमुख पाहुणे होते त्यांनी आपल्या प्रमुख मनोगतात धम्म ही भारताची जीवन जगण्याची कला आहे त्याशिवाय आपण जगू शकत नाही आपण माणूस बनू शकत नाही असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीला नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली 

याप्रसंगी कॉ. कानिफ तांबे यांनी आजच्या काळात धम्म विचार किती प्रसंगिक आहे असे आपले विचार मांडले प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाळंदे कॉ. योगेश सातपुते जॉन पाळंदे योसेफ पराडे सोपान कांबळे मायकल दिवे राजेंद्र वाणी जॉन भिमराज पाळंदे संतोष पाळंदे संजय गाडेकर पक्षी मित्र भिकाजी लोहाळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवराय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून घोषणांनी जय घोष केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!