श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा अभिनव उपक्रम!

Cityline Media
0
एक हात मदतीचा उपक्रमाचे कौतुक 
मुंबई बाबासाहेब दिवे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना मुख्य सचिव  संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बाळासाहेब भवन,शिवसेना कार्यालय येथे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकी दरम्यान “एक हात मदतीचा” या अभिनव उपक्रमांतर्गत बाळासाहेब भवनातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त रोख रक्कम व मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिर्डी देवस्थानातील श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा साईबाबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या शाली देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास शिवसेना राज्य समन्वयक प्रशांत पलांडे,श्रमिक 

राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहिते,प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष कौशिक आनंद, महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा तथा सहसचिव सौ.आशा वैकुंटे, राज्य संघटक नानासाहेब बच्छाव, पालघर संपर्क 

प्रमुख पांडुरंग पाटील, विनायक येसने, प्रवक्ते उल्लास आवारे, दिनेश चावडा आदी मान्यवर उपस्थित होते,बैठकीस पुणे पीएमपीएमएल, टाटा मेमोरियल, वाडीबंदर डेपो, शिर्डी देवस्थान तसेच राज्यातील विविध उद्योग व संस्थांमधील शेकडो कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

राज्य समन्वयक प्रशांत पलांडे यांनी राज्यभर सुरू असलेल्या कामगार चळवळीचा आढावा घेत प्रत्येक जिल्हा व तालुक्यात अधिकृत युनियनची बांधणी, सभासद नोंदणीला गती आणि संघटनात्मक विस्तार यावर भर देण्याचे निर्देश दिले.

पुणे पीएमपीएमएलच्या प्रतिनिधींनी संघटनेच्या आंदोलनामुळे कामगारांना मिळालेल्या न्यायाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. अकोला महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. माधुरी वाघमारे,

राज्य संघटक नानासाहेब बच्छाव, जळगावचे  के. एन. पाटील, संभाजीनगरचे आबासाहेब पाटील व हरीश राठोड, तसेच शिर्डी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दिवे अशोक लोंढे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करत कामगार चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिर्डी देवस्थानातील कामगार सैनिकांनी मान्यवरांचा सन्मान केल्यानंतर सभागृहातील वातावरण भावनिक झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उल्लास आवारे यांनी केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
बाळासाहेब भवनातील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त आणि विक्रमी उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!