खामगावात श्री एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गरजूंना कपडे वाटप

Cityline Media
0
२६ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम

बुलढाणा प्रतिनिधी जिल्ह्यातील खामगाव येथे श्री.सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने अंध,अपंग. मूकबधिर.गरजूंना कपडे.मिठाई वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
दिपावलीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब आप आपल्या परीने दिवाळीचा आनंद साजरा करतात गोडगोड पदार्थ दिव्यांची आरास. नवीन कपडे.नव्या वस्तुंची खरेदी.असा सगळीकडे असतो परंतु गोर गरीबांना या पासून वंचित रहावे लागते.

अशा गोरगरीबाचा सहारा व रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांच्या ही जिवनात दिवाळीचा आनंद फुलावा या भावनेतून वंचित घटकासोबत दिवाळीचा आनंद साजरा करावा असा विचार करणारे काही थोडे लोक असतात  गरीबांची जाण असणारे

 सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे स्थानिक सतिफैल परीसरातील देविदास तथा मुन्ना शर्मा यांनी सन २००० मध्ये ह- भ- प गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली.

 २६ वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ राबवतात ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्नधान्य नाही अशा समाजातील उपेक्षित लोकाप्रती आपले ही काही देणं लागते हा उद्देश समोर ठेऊन अखंड पणे उपक्रम राबवत आहेत.

नुकतेच भाऊबीजचे औचित्य साधुन शहरातील विविध ठिकाणी जाऊन अंध.अपंग.गोरगरीबांना कपडे. महीलांना साडी.मिठाई वाटप  करून दिवाळी साजरी करण्यात आली . 
या प्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघ भारतचे महाराष्ट्र 

प्रदेश महासचिव देविदास शर्मा. विनोद सुकाळे.अरूण कडवकर, दिलीप  झापर्डे. लालाजी सांगळे,प्रमोद सुरंगे.शकुंतला ढवळे. मंगला बावस्कर.संगीता वाघोळे.उषा शर्मा. जान्हवी शर्मा.किर्ती शर्मा व भजनी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!