डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज संगमनेर तालुक्यातील विविध गावांत कार्यक्रम

Cityline Media
0
पिंपळगाव देपा येथील विपश्यांना केंद्र,बुद्ध विहाराचे भुमिपुजन

संगमनेर प्नतिनिधी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते मौजे तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील विपश्यना केंद्र व बुद्ध विहाराचे भुमिपुजन सोमवार दि आज दुपारी साडेतीन वाजता होत आहे तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता व संविधान प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भिमराव आंबेडकर यांचे प्रथमच संगमनेर तालुक्यात आगमन होत आहे त्यांचे स्वागत आपण तेवढ्याच उत्साहाने करणे ही बौद्ध बांधव व भगिनींनी जबाबदारी आहे.

डॉ.भिमराव आंबेडकर हे श्रीरामपूरहून सकाळी ११ वा निघणार आहे ते दु १२ वा निमगाव जाळी येथे उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा व निमगाव जाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल पुढे ते आश्वी मार्गे मौजे शिबलापुर येथील शैक्षणिक संस्था व विकास कामाच्या नियोजित जागेची पाहणी करून पुढे मौजे मालुंजे येथील बुद्ध विहाराच्या जागेचे भुमिपुजन करतील त्यानंतर पिंपरणे मार्गे संगमनेर खुर्द येथे त्यांचे स्वागत करण्यात येईल.

पुढे ते चंदनापुरी मार्गे पिंपळगाव देपा येथे त्यांचे आगमन होईल. पिंपळगाव देपा येथील नियोजित विपश्यना केंद्र व बुद्ध विहाराचे भुमिपुजन करुन ते संगमनेर शहरातील सिध्दार्थ हायस्कूल येथे भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध उपासक - उपासिका , संविधान प्रेमी जनतेशी संवाद साधणार आहे.

तरी या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. भिमराव आंबेडकर  यांचे भव्य दिव्य स्वागत करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा संगमनेर यांनी केले आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!