महाराष्ट्र सरकारच्या अमृत योजनेचा सर्व सामान्यांनी लाभ घ्यावा - विश्वजीत देशपांडे

Cityline Media
0
अहिल्यानगर कमलेश शेवाळे नेवासा तालुक्यातील ब्राह्मण समाजाची सोनई येथील महादेव मंदिरात छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी परशुराम हिंदू सेवा संघ व देवस्थान इनाम जमीन कृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तसेच अमृत योजनेचे सल्लागार विश्वजीत देशपांडे हे बोलत होते.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अमृत योजनेचा तसेच परशुराम अर्थिक विकास महामंडळाचा समाज्याला किती? फायदा आहे हे व्यवस्थित समजावून सांगितले.यावेळी विश्वजीत देशपांडे यांचा सत्कार परशुराम हिंदू सेवा संघाचे नेवासा तालुकाध्यक्ष सुरेंद्र (बापुदेवा) जोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्ञानेश भालेराव,अनिकेत राजहंस,महेश राजहंस, वैभव शुक्रे,सागर घुंगरे, अर्थव काळे, मोहिनीराज राजहंस ,गणेश देशपांडे,पुरुषोत्तम कुलकर्णी,गौरव जोशी, सौ.प्रीती अनिकेत राजहंस,समर्थ कुलकर्णी आदी उपस्थित होते. परशुराम हिंदू सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तसेच देवस्थान इनाम जमीन कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक कमलेश शेवाळे (देवा) यांनी सर्वाचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!