देवस्थान इनाम धारकांचा आक्रोश मेळावा

Cityline Media
0
अहिल्यानगर कमलेश शेवाळे परशुराम हिंदू सेवा संघ व देवस्थान इनाम जमीन कृती समिती यांच्या वतीने नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील साखरे मंगल कार्यालय येथे देवस्थान इनाम जमीन धारक शेतकऱ्यांच्या आक्रोश मेळावा घेण्यात आला.
यावेळी गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे प्रसिद्ध विधिज्ञ  रविराज जोशी परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष अनिल मुळे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे दशनाम गिरी गोसावी समाजाचे अध्यक्ष ओमप्रकाश गिरी 

मराठवाडा इनाम हक्क परिषदेचे ॲड.राजेंद्र बन रामचंद्र महाराज गोसावी तडवळे समन्वयक सुनील कुलकर्णी अरविंद कुलकर्णी आबा शेलार ॲड.स्वप्निल देशमुख अवधूत गिरी मराठवाडा समन्वयक गजानन जोशी, बाळकृष्ण बडवे, गणेश जाधव,शामदास वैष्णव,कचरुदास वैष्णव आणि स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यातील देवस्थान इनाम जमिनीसाठी एक कायदा तयार करण्यासाठी सरकारने समिती गठित केली आहे हि समिती प्रचलित कायद्याचा समानतेच्या तत्त्वाचा व घटनादत्त अधिकारांचा विचार न करता या कायद्याचा विचार करत असून गेत वर्षी अशाच प्रकारे आणलेल्या कायद्याला आम्ही विरोध केला त्यामुळे सरकारला तो कायदा मागे घ्यावा लागला.

पुन्हा फक्त काही घटकांचे हित लक्षात घेऊन परत इनाम धारकांवर अन्याय करणारा कायदा आणल्यास सवैधानिक मार्गाने कायद्याचा विरोध तर केला जाईलच त्यासोबतच रस्त्यावर देखील तीव्र आंदोलनाची लढाई केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

देवस्थान इनाम धारक शेतकऱ्यांना सरकार सापत्न वागणूक देत आहे इनामधारकांचे म्हणणे एकूण घेतले जात नाही कायद्याच्या मसुदा समितीत असणाऱ्या सदस्यांचा अभ्यास कमी पडतोय व त्यांना कुणाशी चर्चा देखील करायची नाही ही एकलकोंडी भूमिका खपवून घेतली जाणार नाही.या जमिनी इनाम धारकांच्याच आहेत व त्यांच्याच राहतील त्यांच्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू असे यावेळी विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!