संगमनेर येथे रोहित पठारे हत्येचा अनुसूचित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध

Cityline Media
0
आरोपींना फाशीची शिक्षा व कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

संगमनेर प्नतिनिधी वैजापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील तरुण कार्यकर्ते रोहित पठारे यांची अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेचा अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संगमनेर येथे तीव्र निषेध करण्यात आला.घडलेल्या अमानवी आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत प्रांताधिकारी कार्यालय, संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, संगमनेर भाग व विभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांना निवेदन सादर करण्यात आले.

प्रसंगी यावेळी निवेदन जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, मा. जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे, जिल्हा सरचिटणीस विनोद गायकवाड, काँग्रेसचे गणेश बलसाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानवतेला काळिमा फासणारी घटना
रोहित पठारे यांना मोटार सायकलला बांधून फरफटत नेणे, दगडफेक करणे, हात-पाय मोडणे अशा अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. ही घटना खैरलांजीसारखी जातीय हिंसाचाराची घटना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ही फुले-शाहू-आंबेडकरची भूमी आहे. इथे जातीय द्वेषाला थारा नाही. रोहितला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या  प्रमुख पाच मागण्या 
१ रोहित पठारे हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.
२. पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.
३ पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
४ हे प्रकरण फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवावे.
.५ दोषींना फाशीची शिक्षा व्हावी.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बंटी यादव म्हणाले, “रोहित पठारे यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर मानवतेवरचा हल्ला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल.”

प्रशासनाने निवेदनाची गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!