काँग्रेसच्या शिष्टमंडळाची कुटुंबियांची सांत्वन भेट
वैजापूर प्रतिनिधी रोहित पठारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाच्या वतीने वैजापूर येथे भेट देण्यात आली.यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील,अशी ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीतील ख्यातनाम गायक डॉ. अनिरुद्ध वनकर, महाराष्ट्राचे सह प्रभारी उमेश रगडे,प्रदेश कार्याध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह राज्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैजापूर तालुका डी.वाय.एस.पी फुंदे व पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्याशी या घटनेबाबत चर्चा करण्यात आली. आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच मागासवर्गीय, दलित समाजावरील अन्याय-अत्याचार कायमचे संपुष्टात यावेत,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
प्रसंगी डॉ.अनिरुद्ध वनकर निषेध व्यक्त करताना म्हणाले की,"रोहित पठारे यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर संपूर्ण मानवतेवर आणि संविधानावर झालेला हल्ला आहे. आरोपींना कठोरातु कठोर शिक्षा झालीच पाहिजे.पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे,ही आमची ठाम मागणी आहे. दलितांवरील अन्याय थांबवण्यासाठी सरकारने आता ठोस पावले उचलावीत."
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सह प्रभारी उमेश रगडे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की,
"महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, हे अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे. आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आरोपींना कोणतीही सूट मिळता कामा नये आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनाने कठोर कारवाई करावी,अशी आमची मागणी आहे."
यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढील पदाधिकारी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, प्रदेश सचिव सुनिता ताई अहिरे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष राहुल सावंत, संभाजीनगर शहराध्यक्ष योगेश थोरात, पुणे काँग्रेस अध्यक्ष कुणाल राजगुरू, प्रदेश सचिव राजाभाऊ शेरखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, वैजापूर तालुका अध्यक्ष प्रवीण खाजेकर, राहुल भालेराव, जयपाल दवणे, विनोद जाधव, अविनाश भालेराव, संतोष हिवराले, सरकटे दिनेश भालेराव,सुरज मोरे, किशोर कांबळे, सोमनाथ निकाळजे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी सर्व नेत्यांनी व्यक्त केला.
