नृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी) १९ व्या शतकात तमाशा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील आद्य महिला नृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी येथील ग्रामपंचायत ठरावाद्वारे नुकतीच करण्यात आली.
ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी असा ठराव केला असुन कला साम्राज्ञी पवळा कला मंचचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीन भालेराव यांनी या मागणीचे निवेदन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले.
१९.व्या शतकात पुरुषप्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेचा पगडा होता,सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती,आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले.त्यांनी पठ्ठे बापूराव यांच्या बरोबर महाराष्ट्रभर सर्वत्र वगनाट्य लावण्या सादर केल्या. छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील राजदरबारात मिठाराणीचे वगनाट्य पवळा भालेराव व पट्टे बापूराव यांनी सादर केले आहे.महाराष्ट्र शासनाने सन २००२ मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कारास त्यांचे नाव देऊन सन्मान केला आहे.
पवळा यांना भारतरत्न पुरस्कार मिळल्यास या गावचे तसेच संगमनेर तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल महाराष्ट्रातील तमाशा लोककलेचा इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला जाईल त्यामुळे या महान लोकलेचा उचित योग्य सन्मान भारत सरकारकडून झाल्यास तो लोककला क्षेत्रासाठी एक सुवर्ण क्षण ठरेल, अशी भावना हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी व्यक्त केली.त्यानुसार नृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्याचा ठराव सामाजिक कार्यकर्ते,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी ग्रामसभेत मांडला होता.
सदरचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
सदर ग्रामसभेस अध्यक्ष सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,केशव दवंगे,पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
[हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने घेतलेल्या ऐतिहासिक ठरावाबद्दल ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,भाजपाचे काशिनाथ पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,रघुनाथ भालेराव,अरुण खरात,
राजेश गायकवाड,पत्रकार महेश भोसले,पुरवठा निरीक्षक संदीप निळे,डी.के.गायकवाड, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे,सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,
बच्चन भालेराव,संजय भालेराव,
मन्सूर इनामदार,कैलास दिवटे,
के.एस.गायकवाड,अशोक भालेराव,रंजना भालेराव,सुयोग भालेराव,अभिजीत भालेराव,शैला भालेराव रोहिणी भालेराव,हितेन संगरे,लहानु भालेराव,सत्यजित भालेराव,राजू दारोळे,
बाबासाहेब कदम,विलास कदम,भाऊसाहेब निळे,विजय निळे,दिलीप चाबुकस्वार गुलाब भालेराव,राजू भालेराव,राजेंद्र भालेराव,संजय डहाणे, भाऊसाहेब बोऱ्हाडे, यादव भालेराव,प्रा.छबन मुंन्तोडे,अर्जुन मुंन्तोडे,सुनील मुन्तोडे संतोष भालेराव,बाबसाहेब भालेराव,दिपक भालेराव, समाधान भालेराव,नारायण मोकळ,विकास दारोळे,यांच्यासह
हिवरगाव पावसा ग्रामस्थ,
कलाप्रेमी नागरिक यांनी ग्रामपंचायतचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.]