समतामुलक जयंतीसाठी संगमनेरात लवकरच समिती स्थापन होणार
संगमनेर (किशोर वाघमारे) संगमनेर हे शहर बुद्धीवंताचे शहर म्हणून ओळखले जाते,आणि जिथे प्रज्ञा येते तिथे जिर्ण रुढीच्या चिरफळ्या होऊन निखळून पडतात अशा या नगरीत प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतामुलक जयंतीसाठी लवकरच समिती स्थापन होणार आहे.
येथील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतामुलक आणि सर्वसामावेशक जयंती समितीची बैठक नुकतीच पार पडली.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे,अनुराधा आहेर बहुजन प्रतिष्ठानचे प्रमोद इंगळे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,गोरक्ष राहणे,सामाजिक कार्यकर्ते राम सुरळकर,रवी दिवे दिलीप पराड,रावसाहेब यादव हमीद शेख गणेश पुणेकर संजय बलसाने भास्कर बर्डे,अमोल शिरसागर विठ्ठल शिंदे सतीश वाघमारे दिलीप कदम युवराज तपासे सनी यादव मनीष रुपवते बाबासाहेब कदम सचिन मोकळ आदीसह बहुजन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये बहुजन समाजातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी असतील त्यासाठी लवकरच तालुकास्तरीय समिती देखील केली जाईल असे या बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमातून साजऱ्या होणाऱ्या या सर्वसामावेशक जयंतीसाठी समिती स्थापन करत असताना तालुक्यातील सर्व भौगोलिक रचना लक्षात घेता चर्चा,विनिमय करून त्यांचे नावे आणि पदे जाहीर करण्यात येतील असे सर्वानुमते ठरले.प्रसंगी चळवळीतील सर्व वक्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समतामुलक जयंती बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.उपस्थितांचे आभार आयोजक प्रशांत गायकवाड यांनी मानले.