राहाता (प्रतिनिधी) तालुक्यातील पाथरे बु येथील रहिवासी असलेले चित्रपट अभिनेते प्रमोद पंडीत यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. यानिमित्ताने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
लोणी येथे आयोजित सत्कार प्रसंगी अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकारी सौ.सायली पाटील व पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रमचे मठाधिपती व राहुरी बाजार समितीचे उपसभापती ह.भ.प.डॉ अण्णासाहेब रंगनाथ बाचकर यांनी त्यांचा विशेष सत्कार केला व त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह इतर अनेक लोक उपस्थित होते त्यांच्या निवडीने आभिनेते प्रमोद पंडीत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.