जिल्हास्तरीय दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

Cityline Media
0
जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


अहिल्यानगर (प्रतिनिधी) सोशल ऑलम्पिक भारत-महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण दिव्यांग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर- विळदघाट येथील डॉ, विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये ३८५ दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभासाठी सोशल ऑलम्पिक भारत-महाराष्ट्र अहिल्यानगरच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील उपस्थित होत्या तसेच अहिल्यानगर समाज कल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंटीवार जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे पी. एम.गायकवाड  डॉ,अभिजीत दिवटे वसंत कापडे,दिग्दर्शक अभिनेता प्रमोद पंडीत  सामाजिक‌ कार्यकर्ते,ज्ञानेश्वर साबळे व संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालकांच्या उपस्थितीत स्पर्धी समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.तसेच या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना राज्य व देशपातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!