अकोल्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा प्रयत्न अंगलट;गुन्हा दाखल

Cityline Media
0
अकोले (प्रतिनिधी) तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटना वाढू लागल्या असुन गेल्या तीन दिवसांत अत्याचारांच्या दोन घटना घडल्या आहेत.त्यामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे.नुकत्याच घडलेल्या पहिल्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अगस्ती कारखान्यावरून अटक केली.तर दुसऱ्या घटनेतील आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे अकोले तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.यासंबधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका गावात २५ जानेवारीला इयत्ता ४ थी च्या वर्गा‌त शिकत असलेली ९ वर्षाची मुलगी शाळा सुटल्यावर वडिलांना येण्यास उशीर झाला म्हणून पायी चालत होती.घरी जात असताना आरोपी मोटारसायकल वरून येत तिला म्हणाला,तुझे वडील माझ्या परिचयाचे आहे.त्यांनी मला तुला घरी सोडायला सांगितले आहे.असे म्हणून त्या मुलीला बळजबरीने गाडीवर बसविले,

पुढे ओढ्याजवळ गाडी थांबवून त्या मुलीला गोड बोलत रस्त्यापासून ‌आतील बाजूला नेऊन अत्याचार करण्याच्या तयारीत तो होता त्यावेळी अल्पवयीन मुलगी विरोध करित असताना आरोपीने तिच्या तोंडांत मारले तिने लगेच आरडाओरडा केली.मग आरोपीने तेथुन पळ काढला.त्यानंतर पिढीचे वडील तेथे आले, असता ‌त्या मुलीने सर्व हकीकत सांगताच वडिलांनी त्या आरोपीचा पाठलाग केला,मात्र आरोपीने तात्काळ पोबारा केल्यामुळे त्यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.
यावेळी आरोपीचे नाव व कसलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे पोलिस तांत्रिक दृष्टीने तपास करत होते.
पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ ६ पथके तयार केली,तांत्रिक तपासात काही तासांतच पोलिसांनी आरोपी योगेश भाऊसाहेब शेणकर (वय ३५) रा.कारवाडी कारखाना रस्ता अकोले,यास तो वॉचमन म्हणून असलेल्या अगस्ती कारखाना येथुन मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.

त्याला न्यायालयाने ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आरोपी योगेश भाऊसाहेब शेणकर विरुद्ध गुन्हा र.नं.३३/२०२५/ बी.एन. एस. कलम १३७(२)११५(२) ७३,७६ व पोक्सो ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप हजारे हे करित आहेत 

ही घटना ताजी असतानाच ‌मंगळवारी २८ जानेवारीस तालुक्यातील मुळा विभागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.याबाबत अकोले पोलिसात पिढीताच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली असून त्यात नमूद केले आहे की फिर्यादीची नातेवाईक असलेली ही अल्पवयीन मुलगी घरी जात असताना आरोपी शुभम ऊर्फ तुकाराम शशिकांत निकाळे (वय २३)याने तिची छेड काढली.तिला गाडीवर बसवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागला.या कृत्याने ती अल्पवयीन मुलगी घाबरली व तिने त्या गाडीवरून उडी मारली त्यात ती गंभीर जखमी झाली.या फिर्यादी वरुन आरोपी शुभम शशिकांत निकाळे याचे विरूद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा र‌.न. (बीएनएस) कलम १३७  ‌(२),७४,२८१,१२५(अ) पोक्सो ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तळपे हे करित आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!