[श्री.रामेश्वर विद्यालयचा १०० टक्के निकाल]
संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील श्री.रामेश्वर विद्यालय चणेगाव येधील विद्यालयातील इयत्ता ९वी तील विदयार्थीनी संस्कृती बाळासाहेब शेळके हिने शासकिय रेखाकला ग्रेड इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकाविला असुन विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकला ग्रेड इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा मेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा" २०२४ - २५ चा निकाल १०० टक्के लागला असून इंटरमिजीएट परीक्षेमध्ये सर्वच एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - ११ पैकी ११ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये - उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तसेच (एलिमेंट्री) ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकालही १०० टक्के लागला असून एकूण १७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले.त्यापैकी विद्यार्थी - कु सायली नानासाहेब गुळवे इयत्ता नववी 'ए' ग्रेड मध्ये तर विद्यार्थी कु.संस्कृती बाळासाहेब शेळके नववी,.प्रशांत रामा लोहाळे-नववी बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
उर्वरित १४ विद्यार्थी हे सी ग्रेड मध्ये पास झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे,ज्येष्ठ शिक्षक एच. टी. कानगुडे ,सौ वाळेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था शिक्षण संचालिका सौ. एल.बी.सरोदे,विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पावडे,व सर्व सदस्य, सरपंच सौ.भाग्यश्री खेमनर ज्येष्ठ नागरिक भिमराज बुधे दाढ खुर्दचे सरपंच सतीश जोशी,बँक संचालक बाजीराव खेमनर,बाबासाहेब लोहाळे, भाऊसाहेब ढमक, भास्कर पाटोळे ,विठ्ठल ढमक,सोपान गुळवे,.प्रा.शेरमाळे ज्येष्ठ नागरिक शहाजी.खेमनर, नानासाहेब गुळवे, रामभाऊ गुळवे,शिक्षण विस्ताराधिकारी रभाजी माळी,ज्ञानेश्वर खेमनर,पोलिस पाटील भाऊराव लोहाळे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान ढमक,अनिल पाटोळे,प्रकाश पावडे ,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खेमनर,कृषीभूषण विठ्ठलदास आसावा,विठ्ठल खेमनर,अन्वर शेख,राजेंद्र आहेर बाळासाहेब शेळके आदीसह चणेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.