[अल्पोहरासाठी बालसंस्कार केंद्रास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव देणार प्रति महिना एक हजार रुपये मदत]
हिवरगाव पावसा (नितीनचंद्र भालेराव) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बौद्ध विहारात बाल संस्कार केंद्राच्या वतीने माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली.
बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित सुंदर असे भाषणे,सांस्कृतिक सादर केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हिवरगाव पावसा गावाचे भूमिपुत्र असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,
बौद्धाचार्य गौतम भालेराव,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,
समता सैनिक दल तालुका अध्यक्ष बच्चन भालेराव,संजय भालेराव हे उपस्थितीत होते.
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थी बौद्ध उपासक उपासिका यांना श्रीकांत भालेराव यांनी मार्गदर्शन केले.माता रमाई यांच्या त्यागामुळे व परिश्रमामुळे बाबासाहेब खुप संघर्ष करू शकले,यामध्ये माता रमाई यांचा मोठा सहभाग आहे हे विसरता येणार नाही.बाबासाहेबांच्या दिलेल्या धम्माच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.मागील वर्षापासून हिवरगाव पावसा गावामध्ये बौद्ध विहार येथे बाल संस्कार केंद्र सुरू आहे.
प्रत्येक रविवारी नियमित पणे या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना बुद्ध वंदना व गाथा पाठांतरण व सराव करुन घेतला जातो.वर्षभरापासुन बाल संस्कार केंद्र मार्फत महापुरुषांचे जयंती, स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे.सुंदर असा उपक्रम राबविला जात आहे.
या बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनासाठी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी प्रत्येक महिन्याभरासाठी लागणाऱ्या अल्पोहराच्या खर्चा करिता प्रती महिना एक हजार रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले.त्यांनी आपल्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा संकल्प करत ते हयात असे पर्यंत हिवरगाव पावसातील बौद्ध बाल संस्कार केंद्रास अल्पोहराच्या खर्चा करिता प्रती महिना एक हजार रुपये देणार असल्याचे पुन्हा घोषित केले.
बौद्धाचार्य गौतम भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना धम्म संस्कार वर्गाचे आयोजन नियमित केले जाते.धम्म संस्कार वर्गाचे संचालक नितीनचंद्र भालेराव,बच्चन भालेराव विद्यार्थ्यांकडून धम्म वंदना व सूत्र पठाण नियमित सराव करून घेतात. यावेळी त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.
या जयंती उत्सव समारंभास गावातील जेष्ठ नागरीक गीताराम भालेराव,लहानु भालेराव,मुकेश दरोळे,विकास दरोळे,अंजना भालेराव,निर्मला दरोळे,मीराबाई भालेराव,इंदुबाई भालेराव,अर्चना भालेराव,
चंद्रकला बागुल,यांच्यासह हिवरगाव पावसा येथील बौद्ध उपासक,उपासिका, विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
