श्री.क्षेत्र रामेश्वर मंदिर हे खुप प्राचीन मंदिर असुन पुरातण काळापासून येथे स्थित असलेल्या या मंदिरात आतापर्यंत अनेक ऋषी,साधू पुण्यवंत भेट देऊन गेलेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत चणेगाव पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात,पंचक्रोशीतील अनेक मल्लासाठी येथे हगामा देखील भरविला जातो,रात्री पुन्हा जाहीर हरी किर्तन होईल.
चणेगाव (इंद्रभान ढमक) संगमनेर तालुक्यातील चणेगाव पंचक्रोशीतील श्री.क्षेत्र रामेश्वर मंदिर चणेगाव येथे सालाबाद प्रमाणे गुरूवार २० फेब्रुवारी ते गुरुवार २७ फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वर पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सप्ताह समितीच्या आयोजकांनी दिली,चणेगाव,धानोरे,दाढ खुर्द येथील भजनी या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी असुन हा हरी जागर कौलाघात निरंतर सुरुच आहे.
गुरुवार २० फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या या पारायण सोहळ्यात सर्व भाविकांना दशरथ किसन ढमक यांच्या वतीने नाष्टा दिला जाईल तर सकाळची पगंत बाबासाहेब लिंबाजी खेमनर हे देतील तर सायंकाळी गावठाण पगंत होईल.संध्याकाळी ह.भ.प.अरुण महाराज दिघे यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
शुक्रवार २१ फेब्रुवारीस सकाळी बाबासाहेब किसन लोहाळे हे नाष्टा देतील सकाळची पगंत भिमा भगवंता गुळवे देतील तर सायंकाळी पगंत येथील सर्व घोगरे परीवार देईल रात्री ह.भ.प.रिठे महाराज यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
शनिवार २२ फेब्रुवारीस रंगनाथ गबाजी सिनारे हे नाष्टा देतील तर सकाळी पगंत ज्ञानदेव सोन्याबापू खेमनर हे देतील तर सायंकाळची पगंत सर्व ढमक परीवार देईल यावेळी रात्री अरुण महाराज गिरी यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
रविवार २३ फेब्रुवारीस अशोक किसन गिरी हे नाष्टा देतील तर सकाळची पगंत मच्छिंद्र विश्वनाथ पावडे देतील तर सायंकाळची पगंत सर्व पावडे परीवार देईल रात्री ह.भ.प.जगन्नाथ महाराज उंबरकर यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
सोमवार २४ फेब्रुवारीस अनिकेत भास्कर पाटोळे हे सर्वांना नाष्टा देतील तर सायंकाळची पगंत राजेंद्र गीताराम दिघे देतील यावेळी सायंकाळीची पगंत गावातील सर्व गुळवे परीवार देईल रात्री बाळकृष्ण महाराज कांबळे कांबळे यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
२५ फेब्रुवारीस सोपान पंढरीनाथ गुळवे यांच्या वतीने भाविक भक्तांना नाष्टा देण्यात येईल तेव्हा सकाळची पगंत शंकर दत्तात्रय हजारे देतील सायंकाळची पगंत सर्व पाटोळे व दिघे परीवार देणार आहे.रात्री सुभेदार भास्कर महाराज भाईक यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
२६ फेब्रुवारी बुधवार शिवरात्री निमित्ताने यात्रोउत्सव सुरू होईल तर सायंकाळी पगंत हौशाबापू बाबुराव पाटोळे देतील सायंकाळची पगंत शंकर भिमाजी गुळवे हे देतील रात्री ह.भ.प.अर्जुन महाराज चोधरी यांचे जाहीर हरी किर्तन होईल.सर्व भाविक भक्तांना पिण्यासाठी पाणी जार पुरवठा धानोरे येथील विशाल सर्जेराव दिघे व चनेगाव येथील संजय रेवजी खेमनर,अण्णासाहेब सयाजी पाटोळे यांच्या वतीने करण्यात आला आहे.
गुरुवार २७ फेब्रुवारीस ह.भ.प अमोल महाराज पिसे यांचे काल्याचे किर्तन होईल यावेळी गावातील खेमनर परीवाराकडून काल्याची पगंत दिली जाईल.
आठ दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये चणेगाव पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले.
