श्रीरामपूर (प्रतिनिधी) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा उत्तर विभागाची कार्यकारिणीचे पुनर्गठन बैठक शनिवार दिनांक नुकतीच संस्थेच्या श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्ध विहारांमध्ये सोसायटीचे विश्वत डॉ. राजाराम बडगे, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक केदारे, राज्य संघटक गौरव पवार यांच्या निवड समितीने गुणवत्तेनुसार पारदर्शक उत्साहात पार पडली.
तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी पदउतार होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांनी आपल्या कार्यकालातील सोळा मुद्द्यांचा कार्य व आर्थिक अहवाल सादर केला.साधू कार करत सर्वांनी तो एकमताने मंजूर केला.प्रसंगी अशोक बोरुडे त्यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ.राजाराम बडगे, भिकाजी कांबळे,अशोक केदारे ,गौरव पवार आदींनी उपस्थितांन मार्गदर्शन केले.
विश्वस्त डॉ राजाराम बडगे यांनी विश्वस्त समिती एक दिलाने,डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने, मैत्री भावनेने काम करतात .अशाच प्रकारचे काम जिल्हास्तरावरही जनमानसात मैत्री भावनेने आपण सर्वांनी काम करावे. तसेच विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाची शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनी अंमलबजावणी करावी .
याप्रसंगी राज्य महासचिव अशोक केदारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ही निवड प्रक्रिया संपूर्ण लोकशाही पद्धतीने अगदी पारदर्शक होणार आहे.तसेच संस्थेची घेतलेली प्रशिक्षणे, शिक्षण संस्थेतील प्रशासकीय कामाचा अनुभव ,संस्थेच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही पदावर काम करण्याची मानसिकता अशा सर्व निकषांचा विचार करून पुनर्गठन करण्याची भूमिका घेतली.
महाराष्ट्राचे प्रभारी भिकाजी कांबळे यांनी महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ८ गोल्डन पॉईंट अभियानाचा सारांश उपस्थित बौद्धाचार्यांना समजावून सांगितला. सर्व आंबेडकरी आणि बौद्ध विचारांचे संघटन तसेच मंडळे यांना सोबत घेत संविधान समर्थक समाज जोडण्याची गरज याप्रसंगी बोलून दाखवली .आत्ता पर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी पुनर्गठनातील विक्रमी उपस्थिती आज सोसायटीच्या अहिल्यानगर उत्तर येथे दिसून आल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष इंगळे यांचे कौतुक केले यानंतर नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली.जिल्हा अध्यक्ष- शांताराम रखमाजी रणशूर (कोपरगाव),सरचिटणीस- नरेंद्र हरिभाऊ पवार(राहाता) कोषाध्यक्ष - नानासाहेब रामभाऊ बनकर(नेवासा)उपाध्यक्ष(संस्कार) संदीप ताराचंद त्रिभुवन(राहाता),उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) -गौतम जयाजी पगारे(राहाता) , उपाध्यक्ष (संरक्षण) -आतिश बाबासाहेब त्रिभुवन(कोपरगाव), हिशोब तपासणीस -विजय हरिभाऊ जगताप (राहाता),कार्यालयीन (सचिव) -लक्ष्मण नामदेव म्हस्के(श्रीरामपूर), सचिव (संस्कार विभाग)- प्रदीप संतू आढाव (अकोले),विजय सखाराम भोसले(राहुरी) , सचिव (प्रचार व पर्यटन) -रावसाहेब सखाहारी पराड (संगमनेर), कैलास चोखा लोखंडे(श्रीरामपूर),सचिव (संरक्षण) -रवींद्र दत्तू जगताप (कोपरगाव),अण्णासाहेब लक्ष्मण जगताप(श्रीरामपूर), संघटक (संगमनेर प्रभारी)- विश्वास किसन जमधडे(कोपरगाव),संघटक नेवासा प्रभारी- रमेश दिनकरराव निकम (कोपरगाव) , संघटक राहता प्रभारी-भीमराव सखाराम कदम (राहाता),संघटक (अकोला प्रभारी)- सुरेश भिकाजी देठे अकोला ,संघटक राहुरी प्रभारी- चंद्रकांत प्रभाकर संसारे (राहुरी),संघटक श्रीरामपूर प्रभारी-अशोक केरू बोराडे(श्रीरामपूर) ,
संघटक कोपरगाव प्रभारी -बिपिन चंद्रभान गायकवाड (कोपरगाव),
डॉ बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक सहायक समिती-ॲड.अण्णासाहेब भागवत मोहन (श्रीरामपूर), चंद्रकांत नामदेव जाधव (राहुरी)यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर उपस्थितांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले की ,बौद्ध व बहुजन समाज यांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया आमची नवनिर्वाचित कार्यकारणी अहोरात्र मेहनत घेऊन करेल.कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि निवड न झालेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपण स्वतःच अध्यक्ष असल्याचे समजून संविधान समर्थक समाज जोडावा.आमची कार्यकारिणी संघटन बांधणीसाठी एक दिलाने काम करून अहिल्यानगर उत्तर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अव्वल ठरेल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली प्रसंगी उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. शेवटी सरणत्तय गाथा घेऊन कार्यक्रम पार पडला.नवनिर्वाचित कार्यकारिणीला के.आर.पडवळ,सत्येंद्र तेलतुंबडे,वाय.एल मुन्तोडे,विशाखा निळे, शिरिष गायकवाड, प्रकाश सावंत,अशोक गायकवाड,अप्पासाहेब मकासरे, प्रा.मेघराज बचुटे, राजेंद्र पटेकर, गणेश पवार, संतोष तेलतुंबडे, प्रा.अजय पवार ,संतोष ब्राह्मणे, ॲड.रावसाहेब मोहन,अण्णासाहेब झिने, प्रा.आनंद मेंढे,अशोक बागुल, महेंद्र त्रिभुवन, बी.बी.पंडित, भगवान दळवी,प्रा.सातुरे,
भास्करमामा लिहिणार, मोगलराव बनसोडे,शरद खंडिझोड आदिनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. नगरचे सुपूत्र राष्ट्रीय सचिव वसंतराव पराड यांनी काव्यातून शांताराम रणशूर आणि नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
