आहिल्यानगर अनुसूचित जाती विभागाच्या वतीने केले होते आयोजन
संगमनेर(किशोर वाघमारे) राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील खळी येथे नुकतेच शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील लाडक्या बहिणींसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते.हे शिबीर डॉ.माने मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
प्रसंगी शिबिराचे उद्घाटन करताना अंगणवाडी सेविका श्रीमती भांड समवेत डॉ.स्वप्निल माने समवेत डॉ.गोरे खळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक सामुदायिक अधिकारी रोकडे व डॉ.निकम खळी येथील आशा सेविका श्रीमती सुनिता नागरे,वर्षा सोसे ग्रा.प.सदस्य सचिन आव्हाड डॉ.माने हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री.सगळे यांच्यासह खळी पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांच्या विविध योजनेला उजाळा देत त्यांना धन्यवाद देत वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.
