शिरुर येथे सार्वजनिक सत्यधर्म लग्न सोहळा उत्साहात

Cityline Media
0


जुन्या गौरवाला ओळखत देवा ब्राम्हणांशिवाय लग्न


शिरुर ( प्रतिनिधी) गुलामीची व्यवस्था नाकारुन तर्क विवेकाच्या आधारे बहुजनांना जागृत करून गुलामीतून मुक्त करणाऱ्या महापुरुषांना अभिवादन करून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सार्वजनिक सत्यधर्म लग्न सोहळा नुकताच पार पडला सोहळा..

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कान्हुर पठार येथील सौ.अलका व इंजि.सुरेश नामदेव भागवत पाटील यांची कन्या ऋतुजा आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा येथील ‌सौ.निर्मला व अशोक बबनराव हांडे पाटील यांचे चिरंजीव विपूल यांचा सार्वजनिक सत्यधर्म लग्न सोहळा नुकताच पुणे जिल्ह्यातील शिरूर-गव्हाणवाडी येथील गुरुकृपा लॉन्स मध्ये मोठ्या थाटात उत्साहात पार पडला.

या सार्वजनिक सत्यधर्म लग्न सोहळ्यासाठी नवविवाहित दाम्पत्याच्या वतीने सर्व आतेष्ठ, समाजातील राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेकांनी वधू वराला आशीर्वाद देऊन उज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्या.

लग्न म्हणजे दोन व्यक्ती,दोन कुटुंब,दोन कुळांचा नाते संबंध निर्माण करण्याचे समाज मान्य साधन आहे.असा विचार या लग्न सोहळ्यातुन समाज मनावर पडला.तर आपल्या जुन्या गौरवाची आठवण ठेवत उधळपट्टीला फाटा सगेसोयरे मित्र व सर्वांसाठी यावेळी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. 

या विवाहाचे संचलन विधीकर्ते  सत्यशोधक प्रा. सचिन झगडे यांनी केले.

प्रेषक सौ.सोनाली,ॲड.ऋषिकेश  ‌भागवत यांनी यावेळी सर्वाचे आदरतिथ्य केले.या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

















टिप-लोकांसाठी..लोकक्रांतीसाठी..समाज माध्यमावर सुरू असलेल्या सिटीलाईन न्यूज वेब न्यूज पोर्टलच्या बातमीच्या खाली दिलेल्या Follow by Email चौकटीत तुमचा मेल आयडी टाकून सबस्क्राईब करा.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!