श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्ध विहारात सभेचे आयोजन
राहुरी (प्रतिनिधी) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने संविधान समर्थक समाज जोडो अभियानाची लुंबिनी बुद्ध विहार श्रीरामपूर येथे शनिवारी दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सभा होणार असल्याची माहिती बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय संस्कार सचिव सत्येंद्र तेलतुंबडे यांनी नुकतीच दिली असुन या सभेची प्रत्येकाने इतरांपर्यत माहिती पोहचवा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
केंद्रीय पातळीवर विश्वस्त एकदिलाने धम्मकार्य करत आहेत. तिचं प्रक्रिया देशभर चालू आहे.त्यानुसार २३ डिसेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार सर्व जिल्ह्यात राबवण्याचे आदेश संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर, विश्वस्त अध्यक्ष डॉ. हरिश रावलिया , रिपोर्टिंग विश्वस्त अध्यक्ष ॲड.सुभाष जौंजाळे यांनी विश्वस्त व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार दिले आहेत.
राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालयीन सचिव ॲड.एस.के. भंडारे,महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे,बी.एच . गायकवाड आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यु.जी.बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे यांच्या सहीने प्रसिद्ध केले आहे.या सभेस निरीक्षक म्हणून विश्वस्त डॉ.राजाराम बडगे,राज्य सरचिटणीस अशोक केदारे,महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे आणि संघटक गौरव पवार उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यामध्ये सर्व बौद्ध धम्म संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे तेलतुंबडे यांनी सांगितले.
अहिल्यानगर उत्तर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीचे सर्व समावेशक पुनर्गठन केले जाणार आहे.या सभेस उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे,आनंद मेढे, के.आर. पडवळ, वाय.एल. मुन्तोडे, शांताराम रणशूर, शिरिष गायकवाड, मधुकर साळवे,अशोक पवार,विजय जगताप, बबनराव अहिरे,राजेंद्र पटेकर,डॉ.प्रविण क्षीरसागर, संजय संसारे, चंद्रकांत जाधव, साहेबराव टपाल, भाऊसाहेब जगदाळे, संतोष तेलतुंबडे, दिनकर साठे,डॉ.संतोष उबाळे,गौतम गोडगे, दादासाहेब साबळे,प्रा. राजेंद्र मेहरखांब,शरद खंडागळे,प्रा.सातुरे, भाऊसाहेब लिहिणार, प्रभाकर खंडागळे , बच्चन भालेराव , सचिन साळवे,प्रबुद्ध भारतचे आप्पासाहेब मकासरे ,प्रा.अजय पवार,अजय साळवे,भूषण साळवे,जाधव,अशोक बोर्डे,लक्ष्मण म्हस्के,प्रकाश सावंत,कैलास लोखंडे ,अतिश त्रिभुवन,रविंद्र जगताप, अण्णासाहेब झिने, सी.एस. बनकर,माजी श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक,धम्म प्रशिक्षक,पदाधिकारी इत्यादींनी केले आहे.
