संगमनेर (किशोर वाघमारे) पंचायत राज व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागामधील माझा गरीब माणूस वंचित न राहता या दृष्टिकोनातून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पंचायतराज भारत सरकार व ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने खळी येथे ७५ घरकुल लाभार्थ्यांना नुकतेच मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
गावचे विद्यमान सरपंच विलास गजानन वाघमारे उपसरपंच तथा राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर जनसेवा मंडळाचे नेते सुरेश नागरे श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत खळी येथे ग्रामपंचायत सभागृहात घरकुल लाभार्थ्यांना १५००० रुपयांचे अनुदान मंजुरी पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी गावचे ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांनी घरकुल लाभार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या असून त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये व कमी दिवसांमध्ये आपले घरकुल पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थ्यांना जागा नाही त्यांना गावठाण हद्दीत जागा उपलब्ध करून देऊन उर्वरित लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल योजनेतून शासनाने आता ५०००० ऐवजी एक लाख रुपये जागा घेण्यासाठी अनुदान योजना सुरू केली असून त्याचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना देणारा असून ज्या लाभार्थ्यांचे शौचालय ऑनलाइन दिसत नाही,त्यांना घरकुलाबरोबर शौचालयचा तसेच मोफत सोलर योजना आधी महत्त्वाचे योजना पंतप्रधान आवास योजना मध्ये तसेच रमाई घरकुल व शबरी घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना मिळणार असून या योजनेचा लाभार्थ्यांनी शासनाच्या लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामसेवक अनिल वाणी यांनी करत रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरीचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे ग्रामसेवक वाणी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
गावातील गरीब माणसाला आपल्या सुंदर घराचे स्वप्न या योजनेच्या रूपाने साकार होणारा असून उर्वरित जे लाभार्थी राहिले असतील त्यांना पुढील टप्प्यांमध्ये शंभर टक्के लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले यावेळी सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दिवेकर,लबडे वस्ती येथील शाळेचे सहशिक्षक श्री हजारे कांगणवाडी शाळेचे शिक्षक श्री सानप बीएसटी विद्यालयाचे श्री मोरे आधी प्रमुख शिक्षक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर पुणे येथे होणाऱ्या पंचायत राज व राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे ऑनलाइन प्रक्षेपण केंद्रीय पंचायत राज व गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय नामदार अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आधी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण घरकुल लाभार्थ्यांना दाखवत लाभार्थ्यांनी मान्यवरांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करत सरकारचे विशेष अभिनंदन केले
यावेळी ग्रामस्थांना व घरकुल लाभार्थ्यांना गावचे उपसरपंच राजेंद्र चकोर व शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी करत घरकुल लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजना सह इतर घरकुल योजनेचे नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व उर्वरित लाभार्थ्यांनी आपले कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जमा करावे व घरकुल सुंदर चांगले कमी खर्चात बांधावे व आपल्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन करत शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेत शुभेच्छा दिल्या.
