मुंबई/संगमनेर (प्नतिनिधी) लोकप्रतिनिधीची तिरकस नजर आणि लोकसेवकांचा अल्प वेळ त्यात शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असलेले तळेगाव दिघे पंचक्रोशीतील तिगाव नेहमीच दुर्लक्षित राहिले त्यातूनच येथील दलित आदिवासी कायमच शासन योजनेपासून वंचित राहिले तळेगाव दिघे पंचक्रोशीत परिवर्तन घडवून आणणारे तिगाव येथील माजी सरपंच विकास गायकवाड यांनी नुकतीच मुंबई येथे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे येथील दलित आदिवासी यांचे प्रश्न मांडले गायकवाड यांच्या अनेक प्रश्नांकडे डॉ.विखे यांचे लक्ष वेधले गेले.समाजातील तळागाळातील अनेकांचे प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन यावेळी श्री.गायकवाड यांना मिळाले.
संगमनेर मध्ये झालेले परिवर्तन म्हणजे समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांना धडा आहे असे बोलले जातेय.यावेळी समवेत तळेगाव दिघे ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप,तिगावचे माजी सरपंच विकास गायकवाड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आत्माराम जगताप उपस्थित होते.
