नाशिक (दिनकर गायकवाड) इगतपुरी तालुक्यातील टाकेद गावात ग्रामसभेत काही दिवसांपूर्वी गोंधळ उडाला होता, त्यात दोन पत्रकारांचे खटके उडाले होते एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारांच्या आईच्या कानशिलात लगावली याचा जाब विचारणाऱ्या येथील बौद्ध महिलेस गावातुन जिवे मारण्याची धमकी येऊ तिने सदर घटनेची फिर्याद देण्यासाठी घोटी पोलिस ठाणे गाठले पण तिची फिर्याद घेतली नाहीच उलट तिला येथील पोलिसांनी मुस्लिम गुंडाकरवी झोडपून काढण्याची धमकी दिल्याने बौद्ध समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की तेथे झालेल्या ग्रामसभेतील गोंधळाची माध्यमात चर्चा झाली होती.ज्या महिलेस ग्रामसभेत मारहाण झाली त्या जेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य होत्या याचा जाब दुसऱ्या ग्रामसभेत विचारणाऱ्या येथील बौद्ध महिला सौ.ज्योती अशोक पगारे (वय ४०) यांनी हा मुद्दा उचलून धरला त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे येथील गावगुंडांचा पोटशूळ उठला आणि त्यात सौ. ज्योती यांना सतत जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या मग ज्योती यांनी घोटी पोलिस ठाणे गाठले ठाण्यात येथील हवालदार सतिश शेलार यांना हा सविस्तर वृत्तांत सांगितला पोलिसांनी या बौद्ध महिलेची अखेर पर्यंत तक्रार घेतली नाहीच उलट त्यांना आज उद्या करून हेलपाटे मारायला लावले अखेर रात्री ९ वाजता. फोन करून हवालदार सतिश शेलार यांनी सौ.ज्योती पगारे यांना पोलिस ठाण्यात बोलाविले परंतु रात्र झाल्याने त्या दुसऱ्या दिवशी घोटी पोलिस ठाण्यात हजर झाल्या तेव्हा टाकेद आधारवड बिट हवालदार सतिश शेलार. ठाण्यात सौ.पगारे यांना म्हणाले तुम्ही जय भिम वाले दोन चार घरे आहेत त्यांनी गावात पाच पंचवीस मुसलमान गुंडाने तुम्हाला झोडपून काढले तर तुला ग्रामसभेत बोलायचा अधिकार कुणी दिला.आम्ही नाही तुझी तक्रार घेत जा तुला काय करायचे ते कर असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली आणि अर्वाच्य भाषेचा सुर काढला त्यावर सौ.ज्योती पगारे यांनी अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲड.राहूल विष्णू तुपलोंढे यांची भेट घेतली व कृती समितीच्या वतीने सदर पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी नाशिक यांना लेखी निवेदन देऊन येथील पोलिस हवालदार सतिश शेलार यांचेवर कारवाईची मागणी केली आहे.निवेदनावर ॲड.राहूल तुपलोंढे, भिका नाना गांगुर्डे, पंढरी प्रभाकर पगारे, अशोक बन्सी पगारे यांच्यासह आहेत.बिट हवालदार सतिश शेलार आणि मारहानीची धमकी देणारे यांचे लागेबांधे असल्याचे बोलले जातेय.
