श्रीरामपूर (दिपक कदम) श्रीरामपूर येथील अतिक्रमण मोहिमेनंतर शहरात व्यापाऱ्यांचा मोठा गलका झाला होता,सर्वजण सैरभैर झाले तेव्हा अनेक राजकीय लोकांनी त्यांना शाब्दिक दिलासा दिला त्यातच येथील शासकीय विश्रामगृहात शहरातील काढलेल्या अतिक्रमण धारक आणि व्यापाऱ्यांची माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्ष अनुराधा अदीक भाजपाचे प्रकाश चित्ते रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मुन्ना झवर व सर्वपक्षीयांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी बैठकीत प्रमुख्याने सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन करून श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना बेघर झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असे यावेळी ठरले.
प्रसंगी भाऊसाहेब कांबळे म्हणाले की महात्मा गांधी पुतळ्या बाजू असणारे जुने कोर्ट ते जिनिंग प्रेस सरकारी फार मोठी जागा आहे त्या जागेमध्ये सरकारने अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराचे पुनर्वसन केले तर व्यापाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटेल तर माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक म्हणाल्या की या
अतिक्रमाणामध्ये काढलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी लवकरच आपल्याला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने शिष्ट मंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन श्रीरामपूरकरांच्या व्यथा मांडू यावेळी भाजपाचे प्रकाश चित्ते म्हणाले की ज्यांचे अतिक्रमणामध्ये दुकाने काढले त्यांनी त्यांचे शॉप ॲक्ट परवाना नगरपालिकेला भरत असलेली कराची पावती स्वतः जवळ ठेवून शासन दरबारी लढावे लागेल तरच न्याय मिळेल रिपाईचे सुभाष त्रिभुवन म्हणाले की बाळाला आपल्या आईचे दूध पिण्यासाठी त्याला रडावे लागते तेव्हा त्याची आई त्याला दूध पाजते म्हणून अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आपल्यावर झालेला अन्याय होत असलेली उपासमार कर्जाचा डोंगर तिव्रपणे शासन दरबारी मांडला तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकार आपली दखल घेऊन न्याय देईल तर मनसेचे बाबा शिंदे यांनी देखील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व सर्व पक्षांनी मोठे जन आंदोलन उभारून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकसंघ व्हावे त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी आंदोलनासाठी मर्चंड असोसिएशनचा जाहीर पाठिंबा दिला आहे त्यावेळी मुन्ना झवर उमेश पवार भैय्या भिसे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी निलेश ओझा संदीप पवार अहमद शहा वसीम बागवान अर्चना पानसरे अँड सुभाष जंगले छावाचे नितीन पटारे दीपक कदम मोहन आव्हाड मनोज काळे विजय शेलार तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार गौतम उपाध्ये यांनी मानले
