कोकणगाव(मच्छिंद्र पवार) राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या आणि निर्णायक जनमताच्या कौलाने आपली राजकीय ओळख दृढ केलेल्या संगमनेर तालुक्यातील कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी जनसेवा विकास मंडळाचे ग्रामपंचायत सदस्या सौ.राधिका बाळासाहेब पवार यांची नुकतीच बहुमताने निवड करण्यात आली.यासाठी १८ फेब्रुवारीस निवणुक प्रक्रिया पार पडली होती.
यावेळी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते भारत जोंधळे,प्रकाश वायकर हिरामण वायकर जेष्ठ नेते बाळासाहेब भिमाजी जोंधळे सुनिल जोंधळे नितीन पानसरे अमोल शिंगोटे डॉ.संदीप जोंधळे ॲड. किरण पानसरे बापु वायकर ज्ञानेश्वर जोंधळे दत्तु पांडव अभिषेक वायकर कृष्ण जोंधळे महेश जोंधळे निलेश जोंधळे कैलास पवार दत्तु पवार नाना पवार आवि जोंधळे आदी कार्यकर्त्यांनी अथिक परिश्रम घेतले उपसरपंच निवडीमुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण असुन कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला तसेच पुढील ग्रामपंचायत सत्ता स्थापनेसाठी सज्ज असल्याचे उपसरपंच निवडीतून दाखवुन दिले,त्यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.