कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून एकल महिलांना प्राधान्य द्यावे- विनायक देशमुख

Cityline Media
0

कौशल्य विकास समितीची बैठक उत्साहात 

अहिल्यानगर (प्नतिनिधी): " कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकल महिलांना सक्षम करण्याला प्राधान्य द्यावे," अशी सूचना कौशल्य विकास समितीचे सदस्य.विनायक देशमुख यांनी केली जिल्हा कौशल्य विकास समितीच्या बैठकीत केली.
येथील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कौशल्य विकास समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी .आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी.दीपक दातीर, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आचार्य चाणक्य योजना,किमान कौशल्य कार्यक्रम, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम तसेच अन्य कौशल्य विकास योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना समितीचे नवनियुक्त सदस्य विनायक देशमुख म्हणाले," जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यामध्ये विधवा,परितक्त्या, घटस्फोटीत अशा एकल महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांना कौशल्य विकासाचे योग्य ते प्रशिक्षण दिल्यास त्यांचे कुटुंब आपल्या पायावर आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे उभे राहील.त्यामुळे कौशल्य विकास कार्यक्रमाचा आराखडा ठरवितांना एकल महिलांना विशेष प्राधान्य दिले जावे. २०२५ हे वर्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे  जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील किमान ३०० एकल महिलांचे कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यात यावे," .
प्रारंभी कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त  निशांत सूर्यवंशी यांनी  जिल्ह्यातील कौशल्य विकास कार्यक्रमाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शासकीय जमीन प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या कामी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी. सिध्दराम  सालीमठ यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.  जिल्हास्तरावर मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रस्तावावर चर्चा होऊन याबाबत शासनाकडे शिफारस व पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!